सुरमईचे कालवण l सुरमई फिश करी l SURMAI FISH CURRY RECIPE IN MARATHI

 सुरमई फिश करी 

surmai fish curry
Surmai fish curry 

आज मी तुमच्या बरोबर सुरमई फिश करी (सुरमईचे कालवण) बनवण्याची रेसिपी शेयर करत आहे. या कालवन मधे खोब्राचा वापर न करता आपण ग्रेवी तैयार करुया. 

सुरमई फिश फ्राई :

  • 2 सुरमई फिश 
  • हळद पाउडर
  • लाल मिर्ची पाउडर
  • मीठ चवीनुसार
  • २ टेबलस्पून तेल 

सुरमई कालवण :

  • १ माध्यम साइज़ कांदा चिरलेला
  • १ माध्यम साइज़ टोमेटो चिरलेला
  • २ हिरवी मिर्ची 
  • मुठभर कोथिम्बिर
  • ७-८ लसुण पाकड़ी
  • ७-८ मेथी दाने
  • १/४ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल मिर्ची पाउडर
  • १/२ टीस्पून धने पाउडर
  • मीठ चवीनुसार
  • २ टेबलस्पून चिंचेचा कोळ
  • ७-८ कढ़ीपत्ता
  • २ टेबलस्पून तेल

सुरमई फिश करी बनवण्याची विधि :


सर्वप्रथम सुरमई ला साफ़ करुन टुकड़े करून घेउया, धूउन एक प्ले मधे काढून घेउया


आता सुरमई ला हळद, लाल मिर्ची पाउडर आणि मीठ लाऊन मिक्स करून घेउया आणि 10 मिनट मेरिनेट करून घेउया 


10 मिनटानंतर तव्यावर सुरमई फ्राई करून घेउया 


आता एक पैन मधे १ टीस्पून तेल टाकुन कांदा टाकुया आणि कंदा सॉफ्ट झ्ल्यानंतर टोमेटो टाकुन ३ ते ४ मिनट परतुं घेउया आणि एक प्लेट मधे काढून घेउया 

ठण्ड झाल्यानंतर मिक्सर च्या वाटी मधे कांदा टोमेटो हिरवी मिर्ची लसुण पाकड़ी आणि कोथिम्बिर टाकुन मसाला तैयार करून घेउया


आता एका पैन मधे तेल टाकुन गरम करून घेउया , तेल गरम झाल्यानंतर मेथीचे दाने टाकुया 

त्यानंतर ग्राइंड केलेला मसाला आणि कढ़ीपत्ता टाकुन १ मिनट परतुन घेउया 

त्यानंतर सर्व पाउडर मसाले आणि मीठ टाकुन तेल सुटेपर्यंत परतुन घेउया 


तेल सुटल्या नंतर चिंचेचा कोळ आणि १ गिलास पाणी टाकुन मिक्स करुन घेउया आणि ५ ते ६ मिनट उकडून घेउया,

 

त्यानातर फ्राई केलेली सुरमई टाकुया आणि हलक्या हाताने मिक्स करून घेउया, झाकण झाकून ३ ते ४ मिनट शिजवून घेउया 

४ मिनिट नंतर झाकण उघडून कोथिम्बिर टाकुया आणि हलक्या हाताने मिक्स करुन घेउया 


गैस बंद करून गरमागरम सुरमई फिश करी सर्व करुया चपाती बरोबर किंवा भाताबरोबर.


टिप्पण्या