सुकी बोमबील चटनी l Suki Bombil Chutney in Marathi (Dried bombay duck recipe)

 सुकी बोमबील चटनी

Bombil
Suki Bombil Chutney

 आज मी सुकी बोमबील ची चटनी ची रेसिपी शेयर करत आहे . मच्छी मधे सुकी बोमबील ची चटनी तुम्ही चपाती किंवा टिफ़िन मधे किंवा दाल भात बरोबर सर्व करू शकता.

सामग्री :

  • 10-12 सुकी बोमबील
  • 1 कांदा चिरलेला 
  • १ टोमेटो चिरलेला
  • 5-6 लसुण पाकड़ी
  • २ हिरवी मिर्ची 
  • 10-12 कढ़ीपत्ता
  • 1 टीस्पून कश्मीरी लाल तिखट 
  • 1/4 टीस्पून हडद
  • 1 टीस्पून धने पाउडर
  • मीठ चवीनुसार
  • मुठभर कोथिम्बिर चिरलेली 
  • 2 टेबलस्पून तेल

सुकी बोमबील बनवण्याची विधि :

सर्वप्रथम सुके बोमबील साफ़ करून धूउन घेउया, त्याचबरोबर लसुण पाकड़ी ,कोथिम्बिर आणि हिरवीमिर्च ला ठेचुन घेउया

आता एक पेन गरम करून 2 टेबलस्पून तेल टाकुया

तेल गरम झाल्यानंतर चिरलेले कांदे आणि कढ़ीपत्ता टाकुया आणि कांद्याला लाइट गोल्डन रंग येईपर्यंत परतुन घेउया

आता धुतलेली बोमबील टाकुन २ ते ३ मिनट परतुं घेउया 

परत्ल्यानंतर जो आपण मसाला ठेचुन घेतला होता तो टाकुया त्याचबरोबर मीठ आणि पाउडर मसाले टाकुन १ मिनट परतुन घेउया आणि चिरलेला टोमेटो टाकुन एक मिनट परतून घेउया 

आता अर्धा कप पाणी घालून मिक्स करुया आणि मध्यम आचेवरती ५ ते ६ मिनट शिजवून घेउया 

आता high फ्लेम करून एक मिनट परतुं घेउया तेल सुटेपर्यंत.

आणि आपली सुकी बोमबील ची चटनी तैयार झालेली आहे 

चटनी ला तुम्ही सर्व करा चपाती किंवा डाल भात बरोबर.



 

 




टिप्पण्या