मटन पुलाव रेसिपी l Mutton Pulao Recipe in Cooker in Marathi


Mutton pulao

मटन पुलाव खुप वेगवेद्या पधातिने बनवला जातो. आज आपण कुकर मधे कसे झटपट मटन पुलाव तयार करू शकता हे पाहुया. मटन पुलाव चा हा प्रकार खुप सोप्पा आणि टेस्टी तर तयार होतोच त्याचबरोबर झटपट ही तयार होतो. कुकर मधे पुलाव लवकर शिजतो आणि कमी वेडात टेस्टी पुलाव रेडी होतो. तर ही पुलाव ची रेसिपी तुम्ही ही एकदा तयार करा.

 सामग्री :

  • 500gm मटन
  • 500gm कोलम राइस
  • 1 मध्यम साइज़ कांदा चिरलेला
  • 2 बटाटा (optinal)
  • 1 टोमेटो
  • 2 तेजपात
  • 3 लवंग
  • 8 ते 10 काडीमिरी
  • 1 चक्रीफूल
  • 2 छोटे दालचीनी चे टुकड़े
  • 2 हिरवी वेलची
  • 1 मोठी वेलची
  • 1/2 टीस्पून जीरे
  • 4 हिरवी मिर्ची
  • 1/2 कप कोथिम्बिर
  • 10 - 12 लसुन पाकड़ी
  • 2 इंच आल
  • 1/2  टेबल स्पून गरम मसाला पाउडर
  • मीठ चवीनुसार
  • 3 टेबल स्पून तेल

मटन पुलाव बनवण्याची विधि :

1. सर्वप्रथम मटन साफ करून धुउन घ्या, त्यानंतर एक मिक्सर जार मधे कोथिम्बिर आल लसुण आणि हिरवी मिर्ची आणि थोडासा पानी घालून पेस्ट तयार करून घ्या.

 2. आता एक कुकर गरम करून त्यामधे ३ मोठे चमचे तेल टाका, तेल गरम झाल्यानंतर अक्खे गरम मसाले टाका आणि कही सेकंदासाठी परतुन घ्या.

3. आता मटन टाकुन ३ ते ४ मिनितासाठी परतुन घ्या, ३ ते ४ मिनिटानंतर तयार केलेला कोथिम्बिर चा पेस्ट घाला आणि परत १ मिनितासाठी तेल सुटेपर्यंत परतुन घ्या.

 4.आता चिरलेला टोमेटो थोडासा मीठ आणि गरम मसाला पाउडर टाकुन मिक्स करून घ्या आणि कमी आचेवरती झाकण झाकून १० मिनितासाठी शिजवून घ्या.

 5.आता भात धुउन घ्या आणि कुकर मधे भात टाका आणि मिक्स करून घ्या, मिक्स केल्यानंतर भाताच्या एक इंच वरती पानी टाका आणि मिक्स करून घ्या.

 6. मिक्स केल्यानंतर कुकर च झाकण लावून मध्यम आचेवरती ३ सिटी घ्या आणि गैस बंद करा. गैस बंद करून तसेच राहून द्या १५ मिनितानंतर झाकण उघडून एकदा मिक्स करून घ्या आणि गरमागरम सलाद बरोबर serve करा.

 टिप :

मटन कधी बकरा छोटा असतो तर ते मटन लवकर शिजतो आणि बकरा मोठा असेल तर मटन लवकर शिजत नाही तर मटन जसा असेल त्याप्रमाणे शिजवून घ्या.

पानी भाताच्या एक इंच वरती ठेवल्याने राइस एकदम खिलेखिले होणार. आणि कुकर मधे ही चांगले शिजले जातील.

मटन पुलाव ची ही रेसिपी आवडली तर फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेयर जरुर करा.

 

 

 

 

 

 

 

टिप्पण्या