मटन कोरमा l Mutton Korma Recipe in Marathi


मटन कोरमा ही प्रसिध्द मटन ची डिश आहे. मटन कोरमा वेगवेगद्या पध्तिने बनवले जाते. मटन कोरमा लग्न डिनर किंवा पार्टी मधे पसंद केले जाते.

मटन कोरमा ही प्रसिध्द मटन ची डिश आहे. मटन कोरमा वेगवेगद्या पध्तिने बनवले जाते. मटन कोरमा लग्न डिनर किंवा पार्टी मधे पसंद केले जाते.


सामग्री :
  • 500gm मटन
  • 3 मध्यम साइज़ कांदे चिरलेले
  • 2 दालचिनी
  • 7 - 8 काडीमिरी
  • 1 मोठी वेलची
  • 4 हिरवी वेलची
  • २ स्टार फूल
  • 4 -5 लवंग
  • 2 तमालपत्र
  • 1/2 टेबल स्पून जीरे
  •  1/4 टेबल स्पून हडद पाउडर
  •  1 टेबल स्पून लाल तिखट
  • 1 टेबल स्पून धण जीरे पाउडर
  • मीठ चवीनुसार
  • 1 स्पून गरम मसाला पाउडर
  • 100gm दही
  • 1 टेबलस्पून खसखस
  • 8 - 10 बादाम
  • 2 टेबल स्पून पुदीना
  • 3 टेबल स्पून तेल
  • 4 हिरवी मिर्ची
  • 50gm आल लसून
  • 1/2 कप कोथिम्बिर


मटन कोरमा बनवण्याची विधि :

सर्वप्रथम मटन साफ करून चांगल्या प्रकारे स्वच्छ धुउन घ्या. त्यानंतर हिरवी मिर्ची, आल लसुण, कोथिम्बिर ला मिक्सर मधे टाकुन थोडासा पानी टाकुन पेस्ट टायर करून घ्या. त्याच बरोबर बादाम आणि खसखस च ही पेस्ट टायर करून घेउया.

आता एक कुकर गरम करायला ठेवुया, त्यामधे तेल घालुया. तेल गरम झाल्यानंतर चिरलेले कांदे टाकुया आणि कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतुन घेउया.

आता कांदे एक प्लेट मधे काढून घेउया आणि साइड ला ठेवा.

आता कुकर मधे अखे गरम मसाले घालुन काही सेकंदासाठी परतुं घेउया.

आता धुतलेले मटन टाका आणि ४ ते 5 मिनीटासाठी परतून घ्या.

परतल्यानंतर कोथिम्बिर आल लसुण आणि हिरवी मिर्ची च जो पेस्ट टायर केलेला तो टाका आणि 1 ते 2 मिनिट साठी परतुन घ्या.

सर्व पाउडर मसाले आणि मीठ टाकुन परत तेल सुटेपर्यंत परतुन घ्या.

तेल सुटल्यानंतर अर्धा गिलास पाणी टाकुन मिक्स करुन घ्या, आता कुकर बंद करुन मध्यम आचेवरती 3 ते 4 सिटी घेउन गैस बंद करुन घ्या.

आता कुकर च झाकण उघडून तेल सुटेपर्यंत मोठ्या आचेवरती परतुन घ्या.

आता दही टाकुन , त्याचबरोबर फ्राई केलेले कांदे क्रश करुन टाका, मिक्स करून घ्या आणि परत तेल सुटे पर्यंत परतुं घ्या.

तेल सुटल्यानंतर बादाम आणि खसखस च पेस्ट टाका आणि 2 मिनीटासाठी परतुन घ्या.

आता 1 ग्लास पानी टाकुन मिक्स करून घ्या, आणि मध्यम आचेवरती 7 ते 8 मिनटासाठी शिजवून घ्या.

आता गैस बंद करून घ्या आणि चिरलेली कोथिम्बिर टाका. आणि गरमागरम सर्व करा.


टिप्पण्या